Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

धनंजय मुंडेंनी माझ्या विरोधात षड्यंत्र रचले:मला ठार मारण्याची सुपारी दिली

Updated: नोव्हेंबर 7, 2025

By Vivek Sindhu

मराठा समाजाने शांत रहावे- मनोज जरांगे

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

मराठा समाजाने शांत रहावे- मनोज जरांगे

जालना – माझ्या गाडीचा अपघात करत मला ठार मारण्याचा प्रयत्न होता असा आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. बीडचा कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे, धनंजय मुंडे यांनी माझ्या विरोधात हे षड्यंत्र रचण्याचे काम केले आहे. मराठा समाजाच्या नेत्यांनी हा विषय गांभीर्याने घेणं गरजेचे आहे. कारण वेळ तुमच्यावरही येणार आहे. माझे तुमचे मतभेद असले तरी हा विषय गंभीर आहे. करणाऱ्यापेक्षा करुण घेणारा सर्वात जास्त महत्त्वाचा आहे असे मी मानतो.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, अशा वृत्तीचा आपल्याला नाय नाट करावा लागेल. आरक्षण, राजकारण हा विषय वेगळा आहे. पण जीवावर उठणे हा विषय खूप गंभीर आहे. आपण जर सावध नसतो तर यांचा बाप ठरलो नसतो असे जरांगे यांनी म्हटले आहे.

गाडीने गाडी धडकून मारण्याचा प्लॅन

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, धनंजय मुंडे यांचा पीए की कार्यकर्ते यांनी मिळून हत्येचा कट रचला. त्यामागे धनंजय मुंडे होते. त्यांनी भेट घेत कसा मारायचं याचा प्लॅन केला. गाडीने गाडी धडकून मारू, असा प्लॅन झाला. त्यासाठी परराज्यातील पासिंग असलेली गाडी देण्याची तयारी धनंजय मुंडे यांनी दाखवली, असा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला.

तो धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, पोलिसांनी आरोपींना धरावे का नाही हा त्यांचा विषय आहे. जनतेच्या कोर्टात खरे काय आहे हे सर्वांना माहिती आहे. आम्हाला पोलिसांवर काही शंका नाही. कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याने मी त्यांचे नाव घेणार नाही पण जे दोघे धरले आहे त्यांचे काय केले. बीडचा एक कार्यकर्ता की पीए त्यांने एका आरोपीची भेट घेत त्यांना सोबत नेले आहे. त्यांनी मला मारण्यासाठी 3 पर्याय दिले होते. माझे खोटे रेकॉर्डिंग तयार करायचे होते पण ते भेटले नाही. दुसऱ्या मुद्दा माझा खूनच करुण टाकायचा, तिसरा मुद्दा माझा औषध गोळ्या देत घातपात करण्याचा होता. राज्यातील सर्व घाण आपण संपवणार आहोत.

मराठा समाजाने शांत रहावे

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ज्या व्यक्तीने माझी सुपारी दिली त्याने आजपर्यंत काय केले आणि काय करणार आहे हे कुणालाही समजलेले नाही. पण त्यांनी काही करण्यापूर्वीच आपल्याला सर्व काही समजले त्यामुळे आपण त्यांचे बाप ठरलो आहोत. आमचे देखील हात खूप लांब पर्यत आहेत हे त्यांच्या लक्षात आले असेल. मराठा समाजाने शांत रहावे, सर्वांनी सावध पवित्रा घेणं गरजेचे आहे. मी जोपर्यंत जिवंत आहे तो पर्यंत काही करु नका मी मेल्यावर तुम्हाला काय करायचे ते करा. मी माझ्या समाजासाठी लढायला खंबीर आहे. आपण बेसावध नाही कारण तसे असते तर ही घटना घडून गेली असती. कुणीही असो त्यांचा नायनाट तर होणारच.


Categories

Recent Posts