आझाद मैदानावर आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी
जालना – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आंतरवाली सराटी येथून मुंबईकडे भव्य मोर्चाची सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोर्चा पुढे ढकलावा म्हणून मंगळवारी आपले OSD (विशेष कार्यकारी अधिकारी) मनोज जरांगे यांच्याकडे पाठवले होते.
या माध्यमातून मुंबईत सण काळात आंदोलन होऊ नये, यासाठी समजूत घालण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मनोज जरांगे यांनी मोर्चा 27 ऑगस्ट रोजीच निघणार असल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला होता. दरम्यान, मुंबई पोलिसांनी जरांगे यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. तत्पूर्वी हायकोर्टाने ही परवानगी नाकारल्याने मोठा वाद झाला होता.
मुंबई दौऱ्यावर जाताना मनोज जरांगे यांनी प्रवासा दरम्यान अंकुशनगर येथे आपल्या परिवाराची भेट घेतली, यावेळी त्यांच्या पत्नी सौमित्रा जरांगे यांनी औक्षण केलं, याप्रसंगी मनोज जरांगे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि मुला मुलीला अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं. यावेळी जरांगे यांनी आपल्या मुलीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी सर्वजण भावूक झाल्याचं दिसून आलं.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दरे गावचा दौरा अचानक रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे गणेशत्सवासाठी दरवर्षी दरे या आपल्या मूळगावी जात असतात. मात्र हा दौरा रद्द होण्यामागील नेमकं कारण काय हे अद्याप कळू शकलेलं नाही. भाजप नेत्या तथा आमदार चित्रा वाघ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. मनोज जरांगे यांनी माझे गबाळे उचकण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी काय उचकायचे ते उचकावे. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लातूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून (बुधवार) दोन दिवस बंद राहणार आहे. आडत असोसिएशन आणि हमाल माथाडी कामगार संघटनेने एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे. यामुळे बाजार समितीच्या आर्थिक उलाढाली वर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.