Breaking
Updated: May 30, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupकेज – गुरुवारी सायंकाळपासून झालेल्या दमदार मान्सूनपूर्व पावसाने नदी नाल्यांना भरती आल्याने मांजरा नदी दुधडी भरून वाहू लागल्याने १२ तासात धनेगाव (ता. केज) येथील मांजरा धरणात तब्बल ४.८४९ दलघमी इतका पाणी साठा वाढला आहे.
मागील १५ ते २० दिवसापासून केज तालुक्यात सतत अवकाळी पाऊस पडत असल्याने सर्वत्र पाणी झाले असून धनेगाव येथील मांजरा धरण क्षेत्रात पडलेल्या पावसाने धरणात ६.१०० दलघमी इतका पाणी साठा वाढला होता. त्यात गुरुवारी सायंकाळपासून झालेल्या मान्सूनपूर्व दमदार पावसाने नदी नाल्यांना भरती आल्याने उपनद्यांचे पाणी मांजरा नदीला मिळाल्याने आता मांजरा नदी दुधडी भरून वाहू लागली आहे.
मागील १२ तासात मांजरा नदीच्या पाण्याची धरणात आवक झाल्याने तब्बल ४.८४९ दलघमी इतका पाणी साठा वाढला आहे. तर ३९६३ क्यूसेसने पाण्याची आवक सुरू असल्याची माहिती धरणाचे शाखाधिकारी सुरज निकम यांनी दिली.