Breaking

निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे -जिल्हाधिकारी

Updated: नोव्हेंबर 14, 2025

By Vivek Sindhu

निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे -जिल्हाधिकारी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड – राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र शासन यांनी राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम- 2025 दिनांक 04.11.2025 रोजी घोषित केला असून बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, माजलगाव, धारुर, परळी, अंबाजोगाई या नगरपरिषदा सार्वत्रिक निवडणूका कार्यक्रमात समाविष्ट आहेत. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहीता अंमलात आलेली आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, माजलगाव, धारुर, परळी, अंबाजोगाई या नगरपरिषदाच्या निवडणूका शांततेत व खुल्या वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली दि.4 नोव्हेंबर ला निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केलेले आहे.

 त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख व कार्यालय प्रमुख यांची बैठक दि. 5 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात येऊन सदर बैठकीत आदर्श आचार संहितेचे पालन करणे व प्रभावीपणे अंमलबजावणी करणे बाबत तसेच कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणे बाबत आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत.

         बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, माजलगाव, धारुर, परळी, अंबाजोगाई या नगरपरिदांच्या सार्वत्रिक निवडणुका शांततेत व खुल्या वातावरणात पार पाडण्यासाठी खालील मुद्यांच्या अनुषंगाने आदेश पारीत करण्यात आलेले आहेत.

    शासकीय/निमशासकीय कार्यालये/विश्रामगृहे इ. परिसरात मिरवणुका काढणे, घोषणा देणे व सभा घेणे इ. बाबींबाबत निर्बंध, सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कार्यवाही करणे.उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल करतेवेळी अवलंब करण्याची कार्यपद्धती. नमुना मतपत्रिका छपाईवर निबंध घालणेबाबत. धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध,धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निबंध घालणे. मोटारगाड्या वाहनांचा ताफ्याचा वापर करण्यास निर्बंध घालण्याबाबत.

प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचारांचे कापडी फलक, झेंडे लावणे इ. बाबींसाठी निबंध घालणे, ध्वनीक्षेपकाचे वापराबाबत निबंध सार्वजनिक इमारतीचे ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, रहदारीस अडथळा निर्माण न होवू देण्यासाठी निबंध घालण्याबाबत. खाजगी व्यक्तींच्या जागेवर/सार्वजनिक जागेवर झेंडे, भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध घालणे, उपरोक्त प्रमाणे आदेशांचे पालन सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व नागरिकांनी करावेअसे आवाहन जिल्हाधिकारी विविेक जॉन्सन यांनी केले आहे.


Categories

Recent Posts