Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

किराणा सामान न दिल्याने राडी येथे लाकडी काठीने मारहाण

Updated: जानेवारी 30, 2026

By Vivek Sindhu

किराणा सामान न दिल्याने राडी येथे लाकडी काठीने मारहाण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: “तू आम्हाला किराणा सामान का देत नाहीस” असे म्हणत काही तरुणांनी संगनमत करून एका व्यक्तीला लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याची घटना राडी येथे घडली आहे.

चंद्रशेखर बबरुवान बनसोडे (वय २९, रा. राडी) यांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. २८ जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर अमर भगवान गांदले, अश्रुबा बळीराम वाघमोडे आणि दीपक बळीराम वाघमारे यांनी फिर्यादीला गाठले. “तू आम्हाला किराणा का देत नाहीस” असे विचारत त्यांनी लाकडी काठीने चंद्रशेखर यांच्या नाकावर आणि पाठीवर मारून जखमी केले. तसेच “जर तू आमच्यावर केस केली तर तुला जीवे मारून टाकू” अशी धमकीही दिली.

या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक फौजदार नन्नवरे तपास करत आहेत.


Categories

Recent Posts