Breaking
Updated: डिसेंबर 15, 2025
आठ जणांवर परस्परविरोधी गुन्हे
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelनेकनूर: माळेवाडी शिवारात सोलर पॉवर लाईनचे काम सुरू असताना अज्ञात चोरट्यांनी लोखंडी पोल चोरून नेले आणि उभ्या केलेल्या पोलचे जेसीबीच्या साहाय्याने नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
दिग्विजय मोहन भोसले (३८, रा. सातारा, सध्या पाटोदा) हे ‘सोलर वर्ल्ड कराड’ या कंपनीचे काम पाहत आहेत. ९ ते १० डिसेंबर २०२५ दरम्यान माळेवाडी शिवारात ३३ केव्ही लाईनचे काम सुरू असताना अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीचे तीन लोखंडी पोल (आरएसजे) चोरून नेले. तसेच १२ उभे केलेले पोल वाकवून त्यांचे नुकसान केले. या चोरीत एकूण ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार गर्जे करीत आहेत.