Breaking

माळेगावात छत्रपती संभाजीराजेंच्या मूर्तीची रथातून मिरवणुक

Updated: May 28, 2025

By Vivek Sindhu

माळेगावात छत्रपती संभाजीराजेंच्या मूर्तीची रथातून मिरवणुक

WhatsApp Group

Join Now

केज – माळेगाव (ता.केज) येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सजवलेल्या रथातून मूर्तीची वाजत – गाजत मिरवणुक काढून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
माळेगाव येथे मंगळवारी सकाळी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक ठिकाणी महाराजांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवप्रेमी नाष्टा व पाण्याची सोय करण्यात आली होती.
सायंकाळी आकर्षकपणे सजवलेल्या रथात धर्मवीर संभाजीराजे यांची मूर्ती ठेवून वाजत – गाजत गावातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय, स्वराज रक्षक धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवराय अशा जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. तर गाण्यावर तरूणांनी ठेका धरला. यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीने लक्ष वेधले. मिरवणुकीत तरूण व नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.