Breaking
Updated: ऑगस्ट 11, 2025
माजलगावमध्ये किरकोळ वादातून महिलेस व मुलास मारहाण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाजलगाव : शहरातील हनुमान चौक, तानाजीनगर येथे किरकोळ वादातून महिलेस व तिच्या मुलास मारहाण करून जीवघेणी धमकी दिल्याची घटना घडली. हा प्रकार ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता उघडला असून, १० ऑगस्ट रोजी पहाटे १ वाजता पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
फिर्यादी किशकिंदा बालासाहेब सोन्नेकर यांच्या मुलाने आरोपी राहुल मस्के यास “आमच्या दुकानासमोरील ट्रकचे आरसे व गोंडे काढू नका” असे सांगितले. यावरून आरोपीने भैया प्रधान व दोन अनोळखी व्यक्तींना फोनवरून बोलावून घेतले. आरोपींच्या टोळीने फिर्यादीच्या घरी जाऊन तिच्या मुलास मारहाण केली.
मारहाणीचा प्रसंग थांबवण्यासाठी फिर्यादी पुढे सरसावली असता आरोपी राहुल मस्के याने तिला कोपराने छातीवर व बेल्टने हातावर मारून दुखापत केली. याच दरम्यान आरोपींनी फिर्यादी व तिच्या मुलास शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी माजलगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सहायक फौजदार वडमारे करत आहेत.