Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

माजलगावात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा छापा; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

Updated: जानेवारी 1, 2026

By Vivek Sindhu

माजलगावात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा छापा; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

माजलगाव: शेलगावथडी शिवारातील गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरवर माजलगाव ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शेलगावथडी ते टाकरवन फाटा रोडवर ही कारवाई करण्यात आली. पोलीस नाईक गोविंद बाबासाहेब बाबरे वय ३२ वर्षे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. कुबोटा कंपनीच्या ट्रॅक्टर चालकाने विनापरवाना बेकायदेशीरपणे वाळू भरून नेताना पोलिसांच्या पथकाला पाहिले आणि तो ट्रॅक्टर सोडून जागीच पळून गेला. पोलिसांनी ९ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर, १ लाख रुपयांची ट्रॉली आणि ६ हजार रुपयांची अवैध वाळू असा एकूण १० लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेसह मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार राठोड पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts