Breaking
Updated: June 16, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupकेज – चांदीचे चैन खरेदी करण्याच्या बहाण्याने गिऱ्हाईक बनून आलेल्या चार अनोळखी महिलांनी सोन्याच्या दुकानातून ५८ हजार रुपये किंमतीचे ७ चैन जोड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.
केज शहरातील कानडी रस्त्यावर कुंदन बालासाहेब जोगदंड यांचे श्री ज्वेलर्स नावाचे सोन्याचे दुकान असून या दुकानात ११ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास चार अनोळखी महिला गिर्हाईक बनून आल्या. त्यांनी पायातील चांदीचे चैन खरेदी करण्याच्या बहाणा करीत कुंदन जोगदंड यांची नजर चुकवून दुकानातून चांदीचे ७ चैन जोड घेऊन निघून गेल्या. त्यानंतर चैन चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. कुंदन जोगदंड यांनी दिलेल्या तक्रारीवरून चार अनोळखी महिलाविरुद्ध केज ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार बाळासाहेब अहंकारे हे करीत आहेत.