Breaking

महाराष्ट्रात रेड अलर्ट

Updated: May 27, 2025

By Vivek Sindhu

महाराष्ट्रात रेड अलर्ट

WhatsApp Group

Join Now

मुंबईः महाराष्ट्रासह तीन राज्यांत हवामान विभागाने पावसाचा रेड अनर्ट जाहीर केला आहे. २७ मे पासून विशेषतः किनारी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज मध्य महाराष्ट्रातील कोकण आणि घाट भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबई आणि पुण्यात मान्सून २६ मे रोजीच पोहोचला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

पुढील २ तासांत जिल्ह्यांमध्ये ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे व मुसळधार पावसासह ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा महाराष्ट्र सरकारने दिला आहे. उत्तर अंतर्गत कर्नाटकात २७ते ३० मे दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तामिळनाडूमध्ये ३१ मे पर्यंत वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचे वारे सुरू राहण्याची शक्यता आहे. केरळमध्ये २९ घरे उ‌द्ध्वस्त झाली आहेत आणि ८६८ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. ७ मे रोजी केरळ आणि माहे येथे काही ठिकाणी अतिवृष्टी, वादळ, विजांचा कडकडाट आणि ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. २८ मे ते १ जून दरम्यान मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

मुंबईत आज भरती…

मुसळधार पावसाचा अंदाजही दिला आहे. १२. १४ वाजता समुद्रात ४.९२ मीटर उंचीची पहिली भरती येईल. यावेळी समुद्रात १५ फूट उंच लाटा उसळतील. तर मंगळवारी रात्री ११:५४ वाजता ४.०८ मीटर उंचीची भरती येईल. हवामान खात्याने उद्‌द्याही मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.