Breaking
Updated: नोव्हेंबर 6, 2025
ऍलोपॅथी उपचार करताना रंगेहाथ पकडले
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगेवराई : तालुक्यातील मादळमोही येथे आरोग्य विभागाच्या पथकाने कारवाई करत ऍलोपॅथी उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरला पकडले. ही कारवाई 4 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता करण्यात आली.
अमलेंदु कुमार हरेन विश्वास, रा. मादळमोही हा व्यक्ती ऍक्युपंक्चर पद्धतीचा व्यवसायिक असूनही ऍलोपॅथी औषधांनी उपचार करत असल्याचे पथकाला अभिजीत क्लिनिकमध्ये दिसून आले. त्याने रुग्ण मलकाबाई पवार (रा. वंजारवाडी), शंकर खताळ (रा. इटकुर), सरस्वती तांबे आणि किर्ती डोंगरे (रा. काजळा) यांना I.V. DNS सलाईन लावून बोगस उपचार केले.
क्लिनिकची पाहणी केली असता तेथे नोंदणीशिवाय 9 खाटा (बेड) असल्याचे आढळले. विचारपूस केली असता विश्वास याने ऍलोपॅथीची प्रॅक्टीस करत असल्याची कबुली दिली. शासनमान्य वैद्यकीय परिषदांचे शैक्षणिक व नोंदणी प्रमाणपत्र त्याच्याकडे आढळले नाही.
ही कारवाई वैद्यकीय अधिकारी अरुण आप्पासाहेब लौकरे यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली. पथकात पी. के. पिंगळे (जिल्हा सर्वेक्षण अधिकारी, आरोग्य विभाग बीड), अभय गौदीकर (तालुका आरोग्य अधिकारी गेवराई), साजिद शेख, झेड. टी. सय्यद आणि यादव बी. एम. हे अधिकारी सहभागी होते.
या प्रकरणी अमलेंदु कुमार हरेन विश्वास याच्याविरुद्ध कलम 33(1), 33(2) महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय कायदा 1961 अंतर्गत गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला असून पुढील तपास अभय गौदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.