Breaking

लोक विकास महाआघाडीची ताकद वाढली ; भिमशक्तीचा ‘कपबशी’ला जाहीर पाठिंबा

Updated: नोव्हेंबर 27, 2025

By Vivek Sindhu

लोक विकास महाआघाडीची ताकद वाढली ; भिमशक्तीचा 'कपबशी'ला जाहीर पाठिंबा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पापा मोदींनी आंबेडकरी चळवळीला पाठबळ दिले – जिल्हा कार्याध्यक्ष भिमराव सरवदे

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोक विकास महाआघाडीला गुरूवारी मोठी राजकीय ताकद मिळाली आहे. भिमशक्ती अंबाजोगाई शाखेने लोक विकास महाआघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी व महाआघाडीच्या नगरसेवकपदासाठी उभ्या असलेल्या सर्वच उमेदवारांना अधिकृत लेखी स्वरूपात पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे लोक विकास महाआघाडीचे बळ वाढले आहे. पाठिंबा देणाऱ्या भिमशक्तीचे लोकविकास महाआघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी यांनी जाहीर आभार मानले आहेत‌. तर भाजप समर्थक विरोधकांच्या कोणत्याही भुलथापांना बळी न पडता सुज्ञ मतदारांनी लोक विकास महाआघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी व सर्वच प्रभागातील नगरसेवकपदाच्या उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन भिमशक्तीचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष भिमराव सरवदे यांनी अंबाजोगाईतील सर्व सुजाण जनतेला करण्यात आले आहे.

अंबाजोगाईत गुरूवारी, दिनांक २७ नोव्हेंबर रोजी राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री तथा खासदार चंद्रकांतजी हांडोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी धर्मनिरपेक्ष लढणारी सामाजिक संघटना म्हणून भारतात ओळख असणाऱ्या भिमशक्ती अंबाजोगाई शाखेने लोकविकास महाआघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी यांच्यासह विविध प्रभागातील सर्वच प्रभागातील नगरसेवकपदाच्या उमेदवारांना जाहीर लेखी पाठिंबा दिला. यावेळी बोलताना बीड जिल्हा कार्याध्यक्ष भिमराव सरवदे यांनी सांगितले की, पापा मोदींच्या नेतृत्वाला अंबाजोगाईकरांची नेहमीच पसंती मिळाली आहे. अंबाजोगाईतील आंबेडकरी चळवळीला पाठबळ व आंबेडकरी नेतृत्वाला योग्य सन्मान, विविध पदे देण्याचे काम मोदी यांनी केले आहे. अंबाजोगाईचा सर्वांगिण विकास करण्यासाठी जनतेला पुन्हा एकदा पापा मोदी हेच नगराध्यक्ष म्हणून हवे आहेत. आम्ही आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लोक विकास महाआघाडीला जाहीर पाठिंबा देत आहोत. असे जिल्हा कार्याध्यक्ष सरवदे म्हणाले. तर यावेळी बोलताना भिमशक्तीचे बीड जिल्हा संघटक जीवनराव घाडगे यांनी सांगितले आहे की, लोक विकास आघाडीवर अंबाजोगाईकरांचा मोठा विश्वास आहे. कारण, याचे नेतृत्व राजकिशोर पापा मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, डॉ.नरेंद्र काळे, माजी उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे हे सर्व जण करीत आहेत. त्यामुळेच आम्ही पाठिंबा दिला आहे. शहराच्या विकासाला प्राधान्य देण्यासाठी आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी लोक विकास महाआघाडी सक्षम असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पाठिंब्यामुळे नगरपरिषद निवडणुकीच्या प्रारंभीच लोक विकास महाआघाडीची ताकद अधिक वाढल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे व दिसून येत आहे. जाहीर पाठिंबा देताना तालुकाध्यक्ष सुमित आवाडे, शहराध्यक्ष संकेत तरकसे, तालुका उपाध्यक्ष प्रशांत धिमधीमे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

=======================


Categories

Recent Posts