Breaking
Updated: मार्च 26, 2026
केज हद्दीत जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज :- केज तालुक्यातील साळेगाव येथे शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या पथकाने टाकलेल्या धाडीत रोख ७ हजार रु, ६ मोटार सायकल आणि ४ मोबाईलसह ६ लाख २७ हजार १०० रु. चा मुद्देमाल जप्त केला. तर यावेळी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले तर तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले.
या बाबतची माहिती अशी की, दि. २४ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने हे त्यांच्या पथकातील दिलीप गित्ते, वाहन चालक मराडे हे वरिष्ठांच्या आदेशाने केज तालुक्यात गस्त घालीत असताना त्यांना एका गुप्त खबऱ्या मार्फत साळेगाव येथे मोहरील मामाच्या दर्ग्याच्या पुढे काही इसम ही तीर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्या माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या पथकाने सायंकाळी केज साळेगाव कळंब रोडवर साळेगाव येथे मोहरील मामू यांच्या कोठ्याच्या पुढे शेवरीच्या जंगलात तीर्रट नावाचा जुगार खेळत असलेल्या ठिकाणी धाड टाकली त्यावेळी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आणि.तिघे पळून गेले.
पोलिसांनी या धाडीत रोख रोख ७ हजार रु, ६ मोटार सायकल आणि ४ मोबाईलसह ६ लाख २७ हजार १०० रु. चा मुद्देमाल जप्त केला.
या सात जणांच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. १५३/२०२६ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाचे कलम १२(ए) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
________________________________
कारवाईच संशयाच्या भोवऱ्यात :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेली कारवाई ही त्यांच्या कार्यपद्धतीवर शंका निर्माण करणारी असल्याची चर्चा सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने ज्या दोघांशी फोनद्वारे संपर्क साधून कारवाई कामी पंच म्हणून उपस्थित होते ते दोघे अवैध्य चोरटी दारू वाहतूक आणि मटका या अवैध्य धंद्याशी संबंधित आहेत. म्हणून स्थानिक गुन्हे शाखा ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने काम करते की, अवैध्य धंदेवाल्यांच्या इशाऱ्यावर काम करते? अशी चर्चा सुरू आहे.