Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

युसुफवडगाव ठाण्याच्या हद्दीत सातेफळ शिवारात कांद्याच्या पिकात अफूची लागवड 

Updated: फेब्रुवारी 17, 2026

By Vivek Sindhu

साडेपाच लाख साडे तेरा किलो अफूसह शेतकरी ताब्यात

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; साडेपाच लाख  साडे तेरा किलो अफूसह शेतकरी ताब्यात

गौतम बचुटे/केज : -स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातेफळ (ता. केज) शिवारात छापा मारून कांद्याच्या पिकात लावलेला साडे पाच लाख रुपयांचा साडेतेरा किलो अफूची झाडे जप्त केली आहेत. पोलिसांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतले आहे.

     सातेफळ (ता. केज) येथील घाडगे वस्तीवरील बन्सी महादेव घाडगे या शेतकऱ्याने कांद्याच्या पिकात अफूची झाडे लागल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेस मिळाल्यानंतर खातरजमा केली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार महेश विघ्ने, जमादार दिलीप गित्ते, जमादार भागवत शेलार, जमादार महेश जोगदंड, जमादार दीपक खांडेकर, जमादार गणेश मरांडे यांच्यासह युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे, फौजदार भिमराव मांजरे यांच्या पथकाने १७ फेब्रुवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास अचानक छापा मारला. यावेळी पथकास कांद्याच्या पिकात अफूची झाडे आढळून आल्याने केजचे नायब तहसीलदार अशोक भंडारे, महसूल मंडळ अधिकारी दयानंद मस्के, सहाय्यक कृषी अधिकारी गणेश पारखे, सहाय्यक कृषी अधिकारी सुदर्शन शेळके यांच्या समक्ष अफूची झाडे उपटून त्यांचे वजन केले. हा अफू साडेतेरा किलो ग्रॅम इतका भरला असून त्याची बाजार भावाने पाच लाख ५० हजार रुपये इतकी किंमत आहे. पोलिसांनी अफूची लागवड करणारा शेतकरी बन्सी महादेव घाडगे याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी शेतकरी बन्सी घाडगे याच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोविकारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १८८५ चे कलम २० नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार भिमराव मांजरे हे तपास करीत आहेत.

——

शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीची गरज :- 

अफू हे मसाल्यात वापर करीत असलेल्या खसखस या पदार्थ असून अनेक शेतकऱ्यांना यावर बंदी आहे. याबाबत माहिती नसल्याने एक मसाल्याचा पदार्थ म्हणून काही झाडे लावल्याची चर्चा आहे. तसेच खसखस खुलेआम बाजारात विक्री होत असल्याने शेतकऱ्यांना त्याचे गांभीर्य लक्षात येत नाही. म्हणून शेतकऱ्यांमध्ये याविषयी जनजागृती करण्याची गरज आहे.


Categories

Recent Posts