Breaking
Updated: मार्च 17, 2026
महिला दिनानिमित्त महिला सफाई कामगारांचा सत्कार; लिनेस क्लबचा उपक्रम
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त अंबाजोगाई शहरात महिला सफाई कामगारांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणार्या महिला कर्मचार्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम लिनेस क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमास उपस्थित लिनेसच्या अध्यक्षा लि.ललिता पुजारी, सचिव लि.रेवती साखरे, कोषाध्यक्षा लि.उषा मोहिते, कॅबिनेट ऑफिसर लि.प्रभावती तट (अवचर), लि.आशा वाघमारे, लि. आयोध्या गाठाळ, उपाध्यक्षा लि.इंदूताई गुट्टे, लि.केशर पोतदार, लि.विजया खोगरे, लि.वर्षा देशमुख यांच्या हस्ते महिला सफाई कामगारांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्या कामाची प्रशंसा करताना शहराच्या स्वच्छतेत त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे नमूद करण्यात आले.
महिला कामगारांनीही आपल्या भावना व्यक्त करताना मिळालेल्या सन्मानाबद्दल समाधान व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे काम करण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास नगरपरिषद पदाधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच महिला दिनानिमित्त हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.