Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

कुत्र्यांच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात चिमुकली जखमी

Updated: डिसेंबर 8, 2025

By Vivek Sindhu

कुत्र्यांच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात चिमुकली जखमी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई -: येथील क्रांती नगर परिसरात राहत आलेल्या ८ वर्षीय चिमुकलीवर या परिसरात मोकाट फिरणाऱ्या १० ते १२ कुत्र्यांच्या कळपाने हल्ला चढवला. तिचा सर्वांनी चावा घेऊन तिला जखमी केले. हा प्रकार रविवारी दुपारी घडला. त्या जखमी मुलीवर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
क्रांती नगर परिसरातील राबिया रहिम शेख (वय-८) ही मुलगी आपल्या मैत्रिणीकडे गेली होती. रस्त्याने ती घरी परत जात असताना त्या परिसरात मोकाट फिरणाऱ्या १० ते १२ कुत्र्यांच्या कळपाने तिच्यावर हल्ला केला. तिच्या शरीरावर कुत्रांनी अनेक ठिकाणी चावा घेऊन तिला जखमी केले. परिसरात असलेल्या नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार येताच त्यांनी कुत्रे हुसकावून लावले. व त्या जखमी मुलीला उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात त्या मुलीवर उपचार सुरू आहेत. त्या मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
शहरात यापूर्वीही मोकाट कुत्र्यांच्या कळपाने नागरिकांना चावा घेतल्याच्या घटना चौसाळकर कॉलनी,माळी नगर, भट्टगल्ली, रविवार पेठ अश्या अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत. मात्र असे प्रकार वारंवार होऊनही प्रशासनाला गांभीर्य नाही.
अंबाजोगाई शहरात प्रत्येक गल्ली बोळात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार होत असूनही नगर परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.


Categories

Recent Posts