Breaking

खडी क्रेशरवर हायवाने झारखंड राज्यातील २५ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू

Updated: डिसेंबर 4, 2025

By Vivek Sindhu

खडी क्रेशरवर हायवाने झारखंड राज्यातील २५ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – केज तालुक्यातील कानडी माळी येथे खडी क्रेशरवर काम करणाऱ्या झारखंड राज्यातील २५ वर्षीय परप्रांतीय मजुराचा खडी व दगडाची वाहतूक करणाऱ्या हायवा आणि खदाणीची भिंत यांच्यात चेंगरून मृत्यू झाला.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील कानडी माळी येथील एका खडी क्रेशरवर झारखंड राज्यातील मोहम्मद साहिल प्रवाज (रा. रागडीह ता. चलकुसा जि. हजारीबाग) हा मजूर म्हणून काम करीत होता. ३ डिसेंबर रोजी सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास मोहम्मद साहिल प्रवाज हा खदाणीच्या भिंती लगत उभा होता. त्या वेळी खडी व दगडाची वाहतूक करणाऱ्या हायवा क्र. (एम एच-२०/इ जी- ४०१२) चालक बाजीराव बापुराव फुंदे (रा. जिवाचीवाडी ता. केज) याने त्याचे ताब्यातील हायवा हयगई व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवल्यामुळे मोहम्मद साहिल प्रवाज वय (२५ वर्ष) हा खदानीचे कडेला दबल्याने तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी दि. ४ डिसेंबर रोजी मयताचे वडील सखावत हुसैन इस्माईलमियाँ यांच्या फिर्यादी वरून हायवा चालक बाजीराव बापुराव फुंदे रा. जिवाचीवाडी ता. केज याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ६६६/२०२५ भा. न्या. सं. १०६(१), २८१, १२५(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक सोनवणे हे तपास करीत आहेत.


Categories

Recent Posts