Breaking

जिल्ह्यात अवकाळी पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान; पंचनामे करा

Updated: फेब्रुवारी 25, 2026

By Vivek Sindhu

बीडचा बहूमान; संसदीय मैत्री गटात खा.बजरंग सोनवणेंची निवड

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

खा.बजरंग सोनवणे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

बीड: जिल्ह्यात २३ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे विविध भागांतील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे त्वरित करण्यात यावेत, अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यासंदर्भात २५ फेब्रुवारी रोजी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.

पत्रात म्हटले आहे, अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये रब्बी हंगामातील पिकांना फटका बसला आहे. अचानक झालेल्या पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके आडवी पडली असून उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळणे गरजेचे असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. महसूल व कृषी विभागामार्फत नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून शासनाकडे नुकसान भरपाईचा प्रस्ताव त्वरित सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील बाधित भागांचा तातडीने आढावा घेऊन पंचनाम्यांचे काम जलदगतीने पूर्ण करावे तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश संबंधित विभागांना देण्यात यावेत, अशी अपेक्षा खासदार सोनवणे यांनी व्यक्त केली आहे. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने त्वरीत कार्यवाही करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असेही पत्रात म्हटले आहे.


Categories

Recent Posts