Breaking

केजमध्ये मटका घेणाऱ्या दोघांना पकडले

Updated: नोव्हेंबर 5, 2025

By Vivek Sindhu

दोघांना मटका घेताना पकडले ; वीस हजाराचा मुद्देमाल जप्त

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – केज शहरातील बसस्थानकासमोर व परिसरात मटका घेणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून नगदी २ हजार आठशे रुपये व मटक्याचे साहित्य जप्त केले.
केज शहरातील बसस्थानकसमोर ॲटो पॉईंट व परिसरात दोघे जण मटका घेत असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, जमादार हनुमान मुंडे, पोलीस नाईक प्रकाश मुंडे, सिद्धीक शहा यांनी अचानक छापा मारून बसस्थानकसमोर ॲटो पॉईंटजवळ बालासाहेब महादेव गायकवाड (रा. विडा) यास मटका घेताना रंगेहाथ पकडले. त्याच्याकडील मटक्याचे साहित्य व नगदी ११०० रुपये जप्त केले. त्यानंतर बसस्थानक परिसरात असलेल्या एका भोजनालयाजवळ अजिम हुसेन पठाण (रा.आजीजपुरा, केज) यास मटका घेताना पकडले. त्याच्याकडील मटक्याचे साहित्य व नगदी १७०० रुपये जप्त केले. पोलीस नाईक सिद्धीक शहा यांच्या तक्रारीवरून बालासाहेब गायकवाड, अजीम पठाण या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Categories

Recent Posts