Breaking

केज येथील कृषी प्रदर्शनास शेतकऱ्यांचा प्रतिसाद

Updated: नोव्हेंबर 10, 2025

By Vivek Sindhu

केज येथील कृषी प्रदर्शनास शेतकऱ्यांचा प्रतिसाद

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

दरवर्षी कृषी प्रदर्शन व्हावे ; शेतकरी, व्यावसायिकांची अपेक्षा

केज – केज येथे ७ ते ९ नोव्हेंबर दरम्यान घेण्याचे आलेल्या कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. तर दरवर्षी कृषी प्रदर्शन व्हावे, अशी अपेक्षा शेतकरी, व्यावसायिकांनी व्यक्त केली.
या प्रदर्शनात महाराष्ट्रातील शेतीशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन, पिक व्यवस्थापन या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या सहभागी झाल्या होत्या. तालुक्यात पहिल्यांदाच कृषी प्रदर्शनाचे आयेाजन करण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांनी, शेतकरी गटांनी कृषी प्रदर्शनास भेटी दिल्या. शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीतील नवीन तंत्रज्ञान, सेंद्रिय शेतीचे महत्त्व, ठिबक सिंचन पद्धत, ड्रोन फवारणी ,ऊस, सोयाबीन, भात, डाळी इत्यादी पिकांची सुधारित वाण यांची माहिती देण्यात आली. विविध कृषी यंत्रसामग्री, खत, बियाणे आणि कीड नियंत्रणाचे उपाय यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

तिसऱ्या दिवशी कृषी प्रदर्शनाची ग्रामीण भागात का गरज आहे. या विषयावर व्याख्यान झाले. शेतकऱ्यांना संपन्न व्हायचे असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही असे मत व्यक्त करण्यात आले. महिलांसाठी विशेष स्वयं सहायता गटांचे स्टॉल लावण्यात आले होते. ज्यामध्ये घरगुती उद्योग, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन या विषयांवर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी कृषी मार्गदर्शन सत्र ही घेण्यात आले. यावेळी प्रयोगशील शेतकऱ्यांनी ही कृषी प्रदर्शनास भेटी दिल्या. या प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाविषयी उत्सुकता निर्माण झाली असल्याचे दिसून आले. तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान समजून घेता आले. प्रदर्शनामध्ये प्रगत शेती, मशिनरी, आधुनिक साधने, सुधारीत बीयाणे, खते, किटक नाशके, दुग्धव्यवसाय या विषयी थेट प्रात्यक्षीके दाखविण्यात आले.

बायोगॅस ड्रायर, ड्रोन प्रात्यक्षिक, ग्रामसंस्कृतीचे देखावे

कृषी प्रदर्शनात ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिक व ग्राम संस्कृती तयार करण्यात आली होती. जिवंत देखावा हे कृषी प्रदर्शनातील महत्त्वाचे आकर्षण ठरले. या भोवती अनेक विद्यार्थी, शेतकरी जिज्ञासुपने निरीक्षण करताना दिसून आले.

सवलतीच्या शेती साधने उपलब्ध झाली

विविध कंपनीचे प्रतिनिधी स्टॉल लावून कृषी प्रदर्शनात सहभागी झाले होते. शेतकरी व्यवसायिकांनी साधनांची खरेदी व बुकिंग केले. तर कृषी प्रदर्शनामुळे सवलतीच्या दरात शेतीची साधने उपलब्ध झाली. त्यातून शेतकऱ्यांचा फायदा झाल्याने समाधान व्यक्त केले.


Categories

Recent Posts