Breaking

केज शहरातील अवैध धंद्यांवर पोलिसांची धडक कारवाई

Updated: नोव्हेंबर 14, 2025

By Vivek Sindhu

Daraḍavāḍīta gharaphōḍī; 2 lākha 62 hajārān̄cā aivaja lampāsa

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज : शहरात अवैध धंद्यावरील कारवाईदरम्यान अंबाजोगाई उपविभागीय पोलिसांनी 13 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास कल्याण मटका जुगाराचा पर्दाफाश करून चार जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत आणि अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अंबाजोगाईला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोउपनि संजय फड आणि त्यांच्या पथकाने वसुंधरा बँकेच्या मागील बंद खोलीत छापा घातला. तपासादरम्यान उत्तम विश्वनाथ वाघमारे वय 55 रा. फुलेनगर केज हा विनापरवाना कल्याण मटका जुगार खेळताना व खेळवताना आढळला. त्याच्या ताब्यात 16 हजार 390 रुपये नगदी, मोबाईल आणि जुगार साहित्य असा मुद्देमाल मिळाला. या प्रकरणात फिर्यादी पोउपनि संजय फड यांच्या तक्रारीवरून उत्तम वाघमारे आणि गणेश खराडे यांच्यावर गुन्हा नोंद झाला.

दरम्यान त्याचवेळी दुसऱ्या छाप्यात शिवराज भगवानराव पाटील वय 40 रा. धारूर रोड केज आणि शेख शकील महेमुद वय 42 रा. रोजा मोहल्ला केज हे देखील कल्याण मटका जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्या ताब्यात 89 हजार 960 रुपये नगदी, मोटारसायकल, मोबाईल आणि जुगार साहित्य आढळले. या कारवाईत पोह/2111 अशोक खेलबुडे यांच्या फिर्यादीवरून शिवराज पाटील, शेख शकील, गणेश खराडे आणि शेख चंद सेठ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही संपूर्ण कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अंबाजोगाईचे अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने केली. पोलीस दलाने अवैध जुगार धंद्यावर केलेल्या या कारवाईनंतर परिसरात दहशत निर्माण झाली असून पुढील तपास सुरू आहे.


Categories

Recent Posts