Breaking

ढाकेफळजवळ भरधाव कारच्या धडकेत चौदा वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Updated: June 22, 2025

By Vivek Sindhu

कारमधील दोघेजण जखमी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले, कारमधील दोघेजण जखमी

केज : केज- अंबाजोगाई रोडवर ढाकेफळ जवळ रोडच्या कडेला शेळ्या चारीत असलेल्या १४ वर्षीय मुलाला भरधाव कारने दिलेल्या धडकेत मुलाचा मृत्यू झाला आहे.
याबाबतची माहिती अशी की दि. २० जून रोजी दुपारी ३:०० वा. च्या सुमारास अंबाजोगाई कडून केज मार्गे बीडच्या दिशेने जात असलेल्या एका भरधाव कार क्र. (एम पी- ०९/झेड जी- २८३७) वरील चालकाचे कार वरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला शेळ्या करीत असलेला बाळू हरिदास काळे या चौदा वर्षाच्या मुलाला कारने जोराची धडक दिली.

धडक दिल्या नंतर कार रस्त्याच्या कडेला जाऊन खड्ड्यात पलटी झाली. या कार मधून प्रवास करणारे मध्यप्रदेश मधील इंदौर जिल्ह्यातील जितेंद्र रघुवंशी आणि हरिसिंग रघुवंशी दोघे जखमी झाले आहेत. दरम्यान अपघातात जोराचे धडक लागलेल्या बाळू हरिदास काळे या चौदा वर्षाच्या मुलास उपचारासाठी रुग्णवाहिकेतून उपचारासाठी बीडच्या दिशेने घेऊन जात असताना केज पासून ६ कि.मी. अंतरावर गेली असताना रस्त्यात बाळू काळे याचा मृत्यू झाला. हरिसिंग रघुवंशी यांच्यावर बीड येथे उपचार करण्यात येत असून जितेंद्र रघुवंशी यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचारासाठी पाठविले आहे.