Breaking
Updated: नोव्हेंबर 27, 2025
कंटेनरच्या धडकेत कारचा चुराडा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – कार व कंटेनरच्या भीषण अपघातात सुदैवाने जिवत हानी झालेली नसून चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना केज – मांजरसुंबा रस्त्यावर रेणू पेट्रोल पंपाजवळ २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.१५ वाजेच्या घडली.
केज शहरापासून जवळच असलेल्या रेणू पेट्रोल पंपाजवळ कारला (एम एच २५ ए जे ९०८९) मांजरसुब्याकडून भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने जोराची धडक दिली. यात कारचा चक्काचूर झाला आहे. मात्र सुदैवाने या अपघात कारचा चालक किरकोळ जखमी झाला असून कार चालक हा धाराशिव जिल्ह्यातील दहिफळ येथील आहे. अपघातानंतर कंटेनर चालक हा कंटनेरसह फरार झाला आहे. पोलीस कंटनेरचा व चालकाचा शोध घेत आहेत.