Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

कँडल मार्च काढून वाहिली स्व. संतोष देशमुखांना आदरांजली

Updated: डिसेंबर 10, 2025

By Vivek Sindhu

कँडल मार्च काढून वाहिली स्व. संतोष देशमुखांना आदरांजली

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – मस्साजोगचे (ता. केज) सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येला ९ डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे गावकऱ्यांनी मंगळवारी रात्री गावातून कँडल मार्च काढून स्व. देशमुख यांच्या फोटोला आदरांजली वाहिली.
मस्साजोगचे (ता. केज) सरपंच स्व. संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी याप्रकरणी वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार या सात जणांना अटक केली होती. तर कृष्णा आंधळे हा वर्षभरापासून फरार आहे. या प्रकरणाचा एसआयटी आणि सीडीआयडीने तपास करून दोषारोप पत्र दाखल केले होते. मात्र अद्याप या प्रकरणाचा निकाल लागलेला नाही.
स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येला ९ डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी मंगळवारी रात्री गावातील महादेव मंदिरापासून कँडल मोर्चाला सुरुवात केली. स्व. संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे, अमर रहे अमर रहे संतोष आण्णा अमर रहे, वाल्मिक कराडला फाशी झाली पाहिजे अशा घोषणा देत गावकरी हातात पेटती मेणबत्ती घेऊन सहभागी झाले होते. गावातील हनुमान मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बसस्थानकापर्यंत कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी स्व. संतोष देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून गावकऱ्यांनी आदरांजली वाहिली. कँडल मार्चमध्ये लहान मुले, महिलांसह तरुण व नागरिक सहभागी झाले होते.


Categories

Recent Posts