Breaking
Updated: नोव्हेंबर 13, 2025
कळंब येथे रिजन कॉन्फरन्समध्ये अंबाजोगाई क्लबचे दैदिप्यमान यश
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : कळंब येथे पार पडलेल्या रिजन कॉन्फरन्समध्ये लायन्स क्लब ऑफ अंबाजोगाईने उल्लेखनीय यश संपादन केले. या परिषदेत लि. आशा वाघमारे यांना ‘बेस्ट प्रेसिडेंट स्पीच’ या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
याशिवाय क्लबने बॅनर प्रेझेंटेशन, जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन, विद्यार्थ्याला सायकल वाटप, तसेच उखाणे स्पर्धा या सर्व विभागांत प्रथम क्रमांक पटकावला. या कामगिरीमुळे अंबाजोगाई क्लबचा गौरव संपूर्ण जिल्ह्यात झाला आहे.
कॉन्फरन्ससाठी लि. आशा वाघमारे, लि. लालिता पुजारी, लि. आयोध्या गाठाळ, लि. प्रभावती तट (अवचर), लि. गयाताई कराड, लि. वनमाला रेड्डी, लि. केशर पोतदार, लि. उषा मोहिते, लि. रेवती साखरे, लि. विजया खोगरे, लि. सीमा परदेशी, लि. त्रिवेणी सातपुते आणि लि. भागीरथी वाडेकर यांनी सहभाग नोंदवला.
या विजयानंतर अंबाजोगाई क्लबच्या सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, क्लबचा आत्मविश्वास आणखीन बळकट झाला आहे.