Breaking
Updated: June 10, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupबीड – बीड जिल्ह्यात सध्या उघडपणानी चोर हे फिरत असून भर रस्त्यावर महिलेच्या गळ्यातील गंठन ओढून चोरून घेऊन जाण्याच्या घटना ह्या दिवसेंदिवस वाढत आहे. या घटना घडत असताना शहरातील सीसीटीव्ही मात्र नेहमी सारखे बंद पडल्याचे दिसत आहे.
ड शहरातील सहयोग नगर परिसरातून एक विवाहित महिलेचे भर दुपारी दोन भामट्यांनी गळ्यातून गंठन ओढून पाल काढला, हे करत असताना विवाहित महिला, थोडक्यात वाचली. तर सध्या चाकार्वाडीत सुरू असलेल्या शिव महापुराण कथेत तीन ते चार महिलांचे दागिने, भाविकाचे पैशाचे पाकीट हे चोरट्यांनी चोरले आहे.
बीड शहरासह जिल्ह्यात गर्दीच्या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणावर भुरटे चोर फिरताना दिसत आहेत. करोडो रुपये खर्च करून शासनाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवली मात्र ती केवळ नावापुरतीच असल्याचे अनेक घटना मधून समोर आले आहे.