Breaking

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर वारकऱ्यांचं भजन

Updated: June 6, 2025

By Vivek Sindhu

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर वारकऱ्यांचं भजन

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

बीड – केज तालुक्यातील सासुरा येथील एकनाथ महाराज मठ संस्थानात अपहार झाला असून या प्रकरणी मठाधिपती व सचिवाची चौकशी करावी या मागणीसाठी गेल्या दोन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. आपल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत उपोषण करणारे काही भक्त झाडावर चढून बसल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती.

केज तालुक्यात असलेल्या सासुरा येथील एकनाथ महाराज मठ संस्थानात गैर व्यवहार झाला. मठाधिपती रतन महाराज उर्फ रतन दत्तोबा मुंडे आणि संस्था सचिव सुशेन रामराव भोसले यांनी गैरव्यवहार केलेला आहे. दि.२ जानेवारी २०२४ रोजी सासुरा ते पंढरपुर पायी दिंडी जात असतांना जमा झालेल्या देणगी संदर्भात कोणतीही माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. देणगी देणाऱ्यांना पावती बुक प्रिंट केलेले सही परत पावती दिली जाईल म्हणुन सांगितले.

मात्र प्रत्यक्षात पावती देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. सदरील मानमत्त संदर्भात माहिती जाणीवपुर्वक लपवली जात आहे. एकुणच सर्व गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्यात यावी यामागणीसाठी गेल्या दोन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालययासमोर शांताबाई पाळवदे सह इतर भक्त आमरण उपोषण करत आहेत. आंदोलनकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने आज (दि.६) शुक्रवार रोजी सकाळी चार उपोषणकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर असलेल्या झाडावर चढून टाळवाजवत भजन केले. भक्त झाडावर चढल्याने प्रशासनाची धावपळ उडाली होती. घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. दुपारी एक वाजेपर्यंत आंदोलनकर्ते झाडावरच बसून होते.