बीड – केज तालुक्यातील सासुरा येथील एकनाथ महाराज मठ संस्थानात अपहार झाला असून या प्रकरणी मठाधिपती व सचिवाची चौकशी करावी या मागणीसाठी गेल्या दोन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. आपल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत उपोषण करणारे काही भक्त झाडावर चढून बसल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती.