Breaking

बीडमध्ये बस प्रवासादरम्यान ४ लाखांचे दागिने लंपास!

Updated: मार्च 4, 2026

By Vivek Sindhu

बीडमध्ये बस प्रवासादरम्यान ४ लाखांचे दागिने लंपास!

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड ते कुंतलगिरी दरम्यान धावणाऱ्या बसमध्ये दोन अनोळखी महिलांनी एका वृद्ध महिलेचे ४ लाख १४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी घडली होती, ज्याचा गुन्हा २ मार्च रोजी नोंदवण्यात आला. फिर्यादी मथुराबाई जगन्नाथ कराडे या जय भवानी चौक येथून बसमध्ये चढल्या असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या जवळील २२ ग्रॅमचे लॉकेट, ३५ ग्रॅमची मोहनमाळ आणि इतर दागिने चोरून नेले. सोन्याच्या वाढत्या किमतींच्या काळात ही मोठी चोरी मानली जात आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस नाईक राडकर या प्रकरणाचा तपास करत आहेत. प्रवाशांनी प्रवासादरम्यान सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


Categories

Recent Posts