Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

जेष्ठ नागरिकांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात

Updated: डिसेंबर 10, 2025

By Vivek Sindhu

जेष्ठ नागरिकांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई (प्रतिनिधी ) येथील जेष्ठ नागरिक संघटनेच्यावतीने आयोजित वार्षिक स्नेह संमेलनाच्या अंतर्गत मंगळवारी घेण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या .
क्रीडा स्पर्धेचा प्रारंभ संघाचे प्रमुख ॲड अनंत जगतकर , संमेलन उपप्रमुख मंगल भुसा , ज्ञानोबा कुडके , कमल बरुळे तसेच विभागीय संघटनेचे जेष्ठ पदाधिकारी डॉ .दामोधर थोरात व जगदीश जाजू यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले .
जेष्ठ पुरुष व जेष्ठ महिलांच्या
लिंबू चमचा स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा , एक किलोमीटर चालण्याची स्पर्धा उत्साहात घेण्यात आल्या त्याला चांगला प्रतिसाद मिळाला .
क्रीडा मार्गदर्शक शिवकुमार निर्मळे, मंगला लोखंडे , श्रीमती हिरवे , अच्युत चाटे , शिवाजी शिंदे ,
जगदीश जाजू , नारायण केंद्रे , भानुदास गुंडरे यांनी स्पर्धा घेण्यासाठी सहकार्य केले .


Categories

Recent Posts