Breaking

जनावरे चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

Updated: सप्टेंबर 4, 2025

By Vivek Sindhu

जनावरे चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पाच जनावरे व दोन चारचाकी वाहने जप्त; पावणेनऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

बीड : जिल्ह्यातील जनावरे चोरणाऱ्या टोळीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत पाच जनावरे व दोन वाहने हस्तगत केली आहेत. या कारवाईत एकूण चार गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर दोन आरोपी फरार आहेत.

पोलीस अधीक्षक नवनित काँवत यांच्या आदेशानुसार बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासमोहीम हाती घेतली होती. दिनांक ३ सप्टेंबर रोजी गुप्त माहितीच्या आधारे गांधीनगर, बीड येथील नितीन संजय जाधव याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या घरातून तीन चोरीची जनावरे जप्त करण्यात आली. चौकशीत त्याने कुंभारवाडी परिसरातून जनावरे चोरल्याची कबुली दिली. त्याच्याविरोधात पोलीस ठाणे शिरुर गुन्हे दाखल झाले आहेत.

त्यानंतर गांधीनगर येथूनच दीपक चंदु गुंजाळ यासही अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून दोन जनावरे आणि चोरीसाठी वापरलेले वाहन जप्त करण्यात आले. त्याच्याविरोधात पोलीस ठाणे गेवराई गुन्हा दाखल झाला आहे.

या कारवाईत एकूण चार गुन्ह्यांचा उलगडा झाला असून चार आरोपींमध्ये नितीन जाधव व दीपक गुंजाळ यांना अटक झाली आहे, तर दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध शिरुर व गेवराई पोलीस घेत आहेत. एकूण चार जनावरे, दोन वाहने मिळून ८ लाख ७९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, हवालदार अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, आशपाक सय्यद, मनोज परजणे, विकी सुरवसे, महिला हवालदार स्वाती मुंडे व चालक सिद्धेश्वर मांजरे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

या कारवाईमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून जनावरे चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता आहे.


Categories

Recent Posts