Breaking

अंबाजोगाईत उद्या ‘जनता दरबार’; जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन सोडवणार नागरिकांच्या समस्या

Updated: जानेवारी 6, 2026

By Vivek Sindhu

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन सोडवणार नागरिकांच्या समस्या

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन हे बुधवार, ७ जानेवारी रोजी अंबाजोगाई उपविभागाच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे दुपारी ४.०० वाजता अपर जिल्हाधिकारी कार्यालय, अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेला ‘जनता दरबार’ होय. या दरबारात जिल्हाधिकारी स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या शंका, अडचणी आणि समस्या ऐकून घेऊन त्याचे जागीच निराकरण करणार आहेत. अंबाजोगाई आणि केज तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार अंबाजोगाई यांच्या वतीने करण्यात आले आहे.

असा असेल जिल्हाधिकाऱ्यांचा दिवसभराचा दौरा

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या दौऱ्याची सुरुवात सकाळी १०.३० वाजता केज तालुक्यातील होळ येथील ‘आपले सरकार सेवा केंद्रा’च्या भेटीने होईल. त्यानंतर ११.०० वाजता ते अंबाजोगाई येथील योगेश्वरी क्रीडा संकुल येथे आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. ११.३० वाजता वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहाची पाहणी त्यांच्याकडून केली जाणार आहे.

दुपारच्या सत्रात १२.१५ वाजता पिंपळागाव धायगुडा येथील दादासाहेब गायकवाड यांच्या सीताफळ प्रक्रिया केंद्राची ते पाहणी करतील. दुपारी २.०० वाजता बर्दापूर येथील ग्रामपंचायत कार्यालय आणि सेवा केंद्राला भेट दिल्यानंतर, दुपारी ४.०० वाजता मुख्य ‘जनता दरबार’ पार पडेल. दौऱ्याच्या शेवटी सायंकाळी ५.०० ते ७.०० या वेळेत अंबाजोगाई आणि केज तालुक्यातील मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांची आढावा बैठक घेऊन ते विकासकामांचा आणि महसुली बाबींचा आढावा घेतील


Categories

Recent Posts