Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

जमीन विक्रीवरून दोन गटात हाणामारी ; चौघांवर गुन्हा

Updated: डिसेंबर 6, 2025

By Vivek Sindhu

संमतीशिवाय शेतातून नेली पाईपलाईन; जेसीबीमुळे पिकाचे दीड लाखांचे नुकसान

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – जमीन विक्री करण्याच्या कारणावरून दोन गटात लाथाबुक्याने व काठीने हाणामारी झाल्याची घटना केज तालुक्यातील सांगवी (सा.) येथे घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
सांगवी (सा.) येथील नितीन रामहरी केदार यांनी त्यांची जमीन ही अशोक केदार यांना विक्री केली असून जमिनीची राजीष्ट्री जानेवारी महिन्यात केली जाणार होती. त्यांना जमीन घेऊ नका, आम्ही आडवे येऊ, वहिती करू देणार नाहीत, असे फोनवरून नानाभाऊ काशिनाथ केदार हे म्हणाले. म्हणून नितीन याने विचारणा केली नानाभाऊ केदार, अशोक काशिनाथ केदार या दोघा भावांनी नितीन व त्याची आई विजयमाला यांना शिवीगाळ कारीत लाथाबुक्क्याने, चापटाने, वेळुच्या काठीने मारहाण करून दुखापत केली.
दुसऱ्या गटाचे अशोक काशिनाथ केदार हे नितीन केदार यास वाटाची जमीन विकू नका म्हणाले असता नितीनने बाभळीच्या लाकडाने त्यांच्या कपाळावर मारून कपाळ फोडले. तर विजयमाला रामहारी केदार या महिलेने त्यांना चापटबुक्क्याने मारहाण केली.


Categories

Recent Posts