केज – अॅक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रेन या उपक्रमांतर्गत केज येथील युवा ग्राम संस्था व रेल्वे सुरक्षा बल (अरपीएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने परळीच्या रेल्वे स्टेशन येथे जागतिक मानव तस्करी विरोधी दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला
या कार्यक्रमात मानव तस्करीचे वाढते प्रकार, तस्करीची कारणे व स्त्रोत, बालकांचे संरक्षण यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थानिक पातळीवर कोणकोणत्या उपाययोजना प्रभावी ठरू शकतात यावर भर देण्यात आला. कार्यक्रमात आरपीएफ, जीआरपी, श्रम निरीक्षक, मुख्य स्टेशन व्यवस्थापक, टीटीई, वेंडर, कुली, सर्व ऑटोचालक, व प्रवासी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. सर्वांनी मानव तस्करीविरोधात जनजागृती करणे व सहकार्य करण्याचा संकल्प केला.
या उपक्रमाचा उद्देश म्हणजे मानव तस्करी या गंभीर सामाजिक समस्येविषयी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे, सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय निर्माण करून एकत्रित कृतीला चालना देणे हा होता.
या उपक्रमाला आरपी एफचे पोलीस निरिक्षक एस. बी. कांबळे, सहाय्यक फौजदार विजय लांडगे, जमादार अमित कुमार, जमादार नम्रता मोरे, नुली सिंग, स्टेशन मास्टर, युवा ग्राम विकास मंडळाचे संतोष रेपे, प्रकाश काळे, सुनिता विभुते, संभाजी वळशे हे उपस्थित होते. यावेळी जेआरसीकडून प्राप्त झालेली ऑडिओ क्लिप स्थानकात हिंदी व इंग्लिश भाषेतून अनाउन्स करण्यात आली.