Breaking
Updated: June 4, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupआमदार सुरेश धस यांच्या दाव्याने खळबळ
बीड – पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाशी संबंधित पोलिस अधिकारी आणि आरोपींवर राजकीय वर्तुळातून गंभीर आरोप होत असून, आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर थेट 300 कोटी रुपयांची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
बीड जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना आमदार धस म्हणाले, जेलमध्ये असलेल्या आरोपींकडून आयपीएस सुपेकर यांनी 300 कोटी रुपयांची मागणी केल्याची तक्रार माझ्यापर्यंत पोहोचली आहे. नातेवाईकांच्या सुनेकडून पैसे मागणे म्हणजे नैतिकतेचा पूर्णपणे ऱ्हास झाला आहे.
एक गाडी- कवट तयार ठेवा- धस
आमदार सुरेश धस म्हणाले की, आता 150 कोटींच्या प्रॉपर्टीचे काय करायचे? हे लोक बाहेर आले तर लोक त्यांच्यावर शेण हाणतील. काहींनी टमाटे फेकले, पण त्याने काही होणार नाही. हे लोक बाहेर आल्यावर त्यांना थेट कवट मारले पाहिजे. अशा प्रकारचे चिथावणीखोर वक्तव्यही त्यांनी केले. जर हे आरोपी जामिनावर बाहेर आले, तर आष्टी मतदारसंघाने एक गाडी आणि कवट तयार ठेवा, असे वक्तव्य करून नव्या चर्चांना तोंड फोडले आहे.
धसांनी देशमुख प्रकरण उचलून धरलं
या आधीही बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात धस यांनी थेट आरोप करत वातावरण चांगलेच पेटवले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक झाली होती. त्यामुळे आता त्यांनी सुपेकर यांना रडारवर घेतल्याने जिल्हा राजकारणात खळबळ उडाली आहे.
सुपेकरांवर यापूर्वीच गृहविभागाकडून कारवाई
दरम्यान, वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणाशी संबंध आढळल्यानंतर गृह विभागाने जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई केली होती. सुपेकर हे विशेष पोलिस महानिरीक्षक (कारागृह व सुधार सेवा) या पदावर कार्यरत होते. मात्र त्यांची पदावरून बदली करत उप महासमादेशक, होमगार्ड या कनिष्ठ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.