Breaking

परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास वेगवान; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे विशेष तपास पथकाचे आवाहन

Updated: मार्च 7, 2026

By Vivek Sindhu

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे विशेष तपास पथकाचे आवाहन

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

परळी: शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या महादेव दत्तात्रय मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास सध्या बीड येथील विशेष तपास पथकामार्फत अत्यंत सखोल आणि गोपनीय पद्धतीने सुरू आहे. या प्रकरणातील गुंतागुंत पाहता तपासाचा भाग म्हणून काही संशयित व्यक्तींच्या पॉलिग्राफ, लाय डिटेक्टर, ब्रेन मॅपिंग आणि नार्को ॲनालिसिस यांसारख्या विविध मानसशास्त्रीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी वनविभाग कार्यालयासमोर महादेव मुंडे यांचा गळा चिरून खून करण्यात आला होता, ज्याबाबत अशोक दत्तात्रय मुंडे यांनी फिर्याद दिली होती.

या तपास प्रक्रियेबाबत अधिकृत स्पष्टीकरण देताना विशेष तपास पथकाने नमूद केले आहे की, मानसशास्त्रीय चाचण्यांचे अहवाल अत्यंत गोपनीय असून ते केवळ तपास यंत्रणेच्या अधिकृत अभिलेखात सुरक्षित आहेत. हे अहवाल कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला किंवा प्रसारमाध्यमांना देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणाबाबत सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. तपासाची दिशा भरकटवणारी किंवा खोटी माहिती प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर तरतुदींनुसार कठोर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. सध्या या गुन्ह्याचा तपास पूर्णपणे पारदर्शक आणि कायदेशीर मार्गाने सुरू असून, सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची सूक्ष्म पडताळणी करण्यात येत असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.


Categories

Recent Posts