Breaking
Updated: मार्च 13, 2026
रामनगर शिवारात भरदिवसा महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र लंपास
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रामनगर तलवाडा शिवारात दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याप्रकरणी तुळसाबाई अंकुश सानप (वय ५०, व्यवसाय शेती, रा. रामनगर) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तुळसाबाई या ९ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेताजवळ असताना, एका दुचाकीवरून दोन अनोळखी तरुण तिथे आले. त्यांनी काही समजण्याच्या आतच तुळसाबाईंच्या गळ्यातील १२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनी मंगळसुत्र बळजबरीने हिसकावले आणि वेगाने पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली, मात्र चोरट्यांचा सुगावा लागला नाही. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.