Breaking

ईकेवायसी न केल्याने ८५४८ शेतकऱ्यांचे अनुदान वाटप प्रलंबित

Updated: डिसेंबर 3, 2025

By Vivek Sindhu

ईकेवायसी करून घ्यावी : तहसीलदार राकेश गिड्डे

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

ईकेवायसी करून घ्यावी : तहसीलदार राकेश गिड्डे

केज – ऑगष्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसाने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाले होते. त्यात केज तालुक्यातील ८५४८ शेतकऱ्यांचे ईकेवायसी न केल्यामुळे ९ कोटी १३ लाख रुपयांचे अनुदान वाटप प्रलंबित राहिले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी ईकेवायसी करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार राकेश गिड्डे यांनी केले आहे.
केज तालुक्यात खरीप हंगामातील सोयाबीन पिकासह इतर पिकांचे ऑगष्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. शासनाकडून नुकसानीपोटी शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करण्यात आले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे. मात्र ईकेवायसी न केलेल्या तालुक्यातील ८५४८ शेतकऱ्यांचे ९ कोटी १३ लाख रुपये इतके अनुदान वाटप प्रलंबित राहिले आहे. त्यामुळे अनुदान न मिळालेल्या प्रलंबित शेतकऱ्यांची ईकेवायसी करून घेण्यासाठी सर्व सीएससी केंद्रावर व ग्रामपंचायत स्तरावर गुरुवारपासून शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तर ईकेवायसी पोर्टल हे सकाळी व सायंकाळी व्यवस्थित चालत असल्याने शेतकऱ्यांनी सकाळी लवकर आणि संध्याकाळी ईकेवायसी करून घ्यावी. असे आवाहन तहसीलदार राकेश गिड्डे यांनी केले आहे.


Categories

Recent Posts