Breaking
Updated: फेब्रुवारी 18, 2026
ऊसतोड मजुराचे कष्टाचे 9 लाख अन् सोने लंपास
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड – बीडच्या पाटोदा तालुक्यातील जवळाला गावात सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी हैदोस घालत दोन घरे फोडली. यामध्ये पोपट मच्छिंद्र कोठुळे यांच्या घरातील 9 लाख रुपयांची रोकड आणि अडीच तोळे सोन्याचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. मुलाने ऊस तोडणीच्या कष्टांतून जमा केलेली पुंजी चोरीला गेल्याने कोठुळे कुटुंबियांनी टाहो फोडला असून, या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी केल्याचे समोर आले आहे. गावात प्रवेश करण्यापूर्वी
चोरांनी सार्वजनिक डीपीमधील फ्युज काढून संपूर्ण गाव अंधारात लोटले. वीजपुरवठा खंडित झाल्याचा फायदा घेत चोरट्यांनी कोठुळे यांच्या घराचा कडीकोंडा आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील 9 लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. सकाळी उठल्यावर घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे पाहून कोठुळे कुटुंबाला चोरी झाल्याचे लक्षात आले.
गावातील वीजपुरवठा जाणीवपूर्वक खंडित करून घरफोडी करणे, ही पद्धत पाहता यामागे परिसरातीलच किंवा विद्युत कामाची माहिती असणार्या एखाद्या जाणकार गुन्हेगाराचा हात असावा, असा संशय व्यक्त होत आहे.