Breaking

जेवणाचे पैसे मागितल्याने हॉटेल चालकाला पाईपने मारहाण

Updated: एप्रिल 13, 2026

By Vivek Sindhu

जेवणाचे पैसे मागितल्याने हॉटेल चालकाला पाईपने मारहाण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई: हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर बिलाचे पैसे मागितल्याच्या रागातून हॉटेल चालकाला मारहाण करून जखमी केल्याची घटना कोळगाव शिवारात घडली आहे. चकलंबा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नितीन सखाराम काचळे (वय ३८, रा. कोळगाव) यांचे हॉटेल असून ११ मार्च २०२६ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आरोपी रामेश्वर माने आणि इतर दोन अज्ञात इसम तिथे जेवण करण्यासाठी आले होते. जेवण झाल्यावर नितीन काचळे यांनी बिलाचे पैसे मागितले असता, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी हॉटेलमधील वायफरच्या पाईपने नितीन यांच्या डोक्यावर आणि कानाच्या मागे जोरात प्रहार केला. तसेच लाकडी काठीने त्यांना बेदम मारहाण करून मुका मार दिला. या मारहाणीत नितीन गंभीर जखमी झाले असून पोलीस हवालदार बारगजे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Categories

Recent Posts