Breaking

हैदराबादच्या ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालयाचा देशात डंका; अधिष्ठाता डॉ. शिरीषकुमार चव्हाण यांचा गौरव

Updated: मार्च 4, 2026

By Vivek Sindhu

अधिष्ठाता डॉ. शिरीषकुमार चव्हाण यांचा गौरव

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: नवी दिल्ली येथील भारतमंडपममध्ये आयोजित कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) ७५ व्या स्थापना दिनानिमित्त हैदराबाद येथील ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालयाला देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महाविद्यालयाचा प्रथम बहुमान प्रदान करण्यात आला. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांच्या हस्ते हा पुरस्कार महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिरीषकुमार चव्हाण यांनी स्वीकारला. या दिमाखदार सोहळ्याला महामंडळाचे सदस्य एन.के. प्रेमचंद्रन, सचिव वंदना गुरनानी आणि महासंचालक अशोक कुमार सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.

देशभरात सध्या ईएसआयसीची एकूण १७ वैद्यकीय महाविद्यालये कार्यरत असून, या सर्व महाविद्यालयांच्या शैक्षणिक, प्रशासकीय आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील कामगिरीचे सूक्ष्म मूल्यमापन करण्यात आले होते. या सर्व निकषांवर उतरत हैदराबादच्या सनतनगर येथील महाविद्यालयाने अव्वल स्थान पटकावून आपली राष्ट्रीय ओळख निर्माण केली आहे. या यशात महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिरीषकुमार चव्हाण यांच्या दूरदृष्टीचा आणि नेतृत्वाचा मोठा वाटा असल्याचे अधोरेखित झाले आहे.

विशेष म्हणजे, डॉ. शिरीषकुमार चव्हाण हे मूळचे अंबाजोगाई येथील असून त्यांचे प्राथमिक तसेच उच्च वैद्यकीय शिक्षणही अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयातून (एमबीबीएस आणि एमडी) पूर्ण झाले आहे. एका ग्रामीण भागातील वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेऊन राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित संस्थेचे नेतृत्व करत तिला देशात प्रथम क्रमांकावर पोहोचवल्याबद्दल डॉ. चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या उत्तुंग कामगिरीमुळे अंबाजोगाईच्या नावलौकिकात मोठी भर पडली आहे.

Categories

Recent Posts