Breaking
Updated: मार्च 9, 2026
महिला दिनी सर्व सामान्य महिलांचा सन्मान
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी) – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अ.भा.पेशवा संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व सामान्य महिलांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी योगेश्वरी देवल कमेटीच्या कोषाध्यक्षा पुजा कुलकर्णी होत्या तर व्यासपीठावर डॉ. गौरी कुलकर्णी,रजनी देशपांडे,अंजली चौधरी,उज्वला कुलकर्णी,अंजली देशपांडे आदी उपस्थित होत्या.
यावेळी कल्याणी राहूल देशपांडे,शैला शैलेष रुईकर,मनिषा विवेक वालेकर,प्रतिभा गणेश अष्टपुत्रे,कल्पना संतोष मुळावकर आदी महिलांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
डॉ.गौरी कुलकर्णी यांनी सन्मानित महिलांचे अभिनंदन करून या महिलांचा सन्मान होणे महत्वाचे असून याची इतर महिलांनी प्रेरणा घ्यावी. तिलोत्तमा पतकराव यांनी ओळख स्पर्शाची या विषयी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपात पुजा कुलकर्णी म्हणाल्या की, महिलांना शिक्षण, सुरक्षितता,समान संधी मिळणे आवश्यक असून महिला दिन हा महिलांच्या हक्काची जाणीव करून देणारा दिवस आहे महिला सक्षमीकरण, सशक्तीकरण याची गरज असून तरच समाजाची प्रगतीच्या दिशेने वाटचाल होईल असे त्यांनी सांगितले. महिलांसाठी झालेल्या उखाणे व इतर स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.उपस्थित मान्यवरांचे स्वागत संघटनेच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्तविकातून कार्याध्यक्ष सुधीर धर्माधिकारी यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला.संचालन अंजली देशपांडे यांनी केले. उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष डॉ.दिलीप कुलकर्णी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी संघटनेचे पदाधिकारी संजय देशपांडे,भास्कर देशपांडे आदीसह परिसरातील महिला, पुरुष उपस्थित होते.