Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

लग्न बीडमध्ये, बिंग फुटले रत्नागिरीत पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

लग्न बीडमध्ये, बिंग फुटले रत्नागिरीत पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

रत्नागिरी - बीड येथे अल्पवयीन मुलीशी लग्न करुन रत्नागिरीत आलेल्या जोडप्याचे बिंग अखेरीस फुटले. तरुणीने घरगुती वादातून झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि तिला जिल्हा शासकीय रुणालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तपास केला असता सारा प्रकार समोर आला. याप्रकरणी शहर पोलिस स्थानकातून झिरो नंबरने बीड येथील पोलिस स्थानकात जोडप्याच्या पालकांविरोधात ङ्गपोक्सोफ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी 18 वर्षे पूर्ण होऊन 5 दिवस झालेल्या विवाहित तरुणीने झोपेच्या गोळ्या घेतल्या. त्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील पोलिस चौकीत कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचार्‍याने त्या मुलीची आणि तिच्या पतीची चौकशी केली. त्यावेळी तो तरुण 27 वर्षांचा आणि ती तरुणी 5 दिवसांपूर्वीच 18 वर्षे पूर्ण झालेली असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तसेच ही तरुणी त्या तरुणाच्या नात्यातीलच असून, त्यांच्यातील प्रेमसंबंधामुळे त्यांच्या नातेवाइकांनी या दोघांचे काही महिन्यांपूर्वी बीड येथे लग्न लावून दिले होते. त्यानंतर नोकरीनिमित्त हे विवाहित जोडपे रत्नागिरीत आले होते.

Wednesday 15th of May 2024 08:02 PM

Advertisement

Advertisement