Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

तेलगाव येथील मतदान केंद्रावरील हिरकणी कक्षाचा बालकांना आधार

    तेलगाव, दि.(प्रतिनिधी)-  तेलगाव येथील मतदान केंद्रावर यंदा प्रथमच हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला होता.हा हिरकणी कक्ष लहान बालकांना मोठा आधार ठरला.यामुळे बालकांच्या मातांनी निवडणुक विभागाचे आभार व्यक्त केले.

        बीड लोकसभा मतदार संघात सोमवार दि.१३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली.या निवडणुकीत मतदारांचा प्रतिसाद वाढुन,मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणुक विभागाने विविध उपक्रम राबवले.यात मतदान केंद्राच्या परिसरात लहान बाळांसाठी हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले होते.या कक्षात लहान बालकांसाठी पाळणा,विविध खेळणी आदि वस्तु ठेवण्यात आल्या होत्या.हिरकणी कक्षामुळे महिलांना बालकांना याचा खुप मोठा आधार मिळाला.या ठिकाणी लहान बालके खेळताना दिसुन आले.या हिरकणी कक्षात अंगणवाडीच्या कार्यकर्त्या अलका लगड, मिना राउत,सुनिता लगसकर,उर्मिला गिरी,मिरा नरवडे,राधा ढवळे, सुमन थोडे,छबुबाई रणशिंग, दुर्गा गिरी आरोग्य कर्मचारी बबन धुमाळ, आरोग्य कर्मचारी सुनिता राउत,देवंगणा कदम, अनिता साबळे सिता आगे आदि कर्मचाऱ्यांनी उत्कृष्टपणे काम केले.

Wednesday 15th of May 2024 07:56 PM

Advertisement

Advertisement