Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

चिंचपूर अंगणवाडी ताई ला ग्रामस्थाचा अश्रूनी भरलेल्या डोळयाने निरोप संस्कारक्षम पिढ्या घडवण्याचे केले काम

किल्लेधारूर. (वार्ताहार) धारूर तालूक्यातील चिंचपूर येथील अंगणवाडी अनिया कौसर खमर कादरी यांनी 37  वर्षाचे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत असल्या बद्दल ग्रामस्थानी अश्रु भर-या डोळयानी त्याना निरोप दिला अंगणवाडी ताई म्हणूण काम करताना अनेक पिढ्या संस्कारक्षम क्षम बालवया पासून घडवण्याचे काम त्यांनी केले.त्यांना निरोप देताना प्रत्येकाचे डोळे पानावले होते. या अंगणवाडीताईला निरोप देताना मातापालक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

तालूक्यातील चिंचपूर येथील 37 वर्षा अंगणवाडी ताई  अनिया कौसर खमर कादरी यांनी उत्कृष्ट काम करत येथील अंगणवाडी हि आदर्श पणे चालवली आपल्या सेवेला सातत्याने प्रथम प्राधान्य दिले संस्कारक्षम व उत्कृष्ट पिढ्या घडवण्याचे काम केले बालवया पासुन जिवन यशस्वी करण्या साठी जेवढे गुणाची गरज असते तेवढे संस्कार बालवयापासुनच करण्यावर या अंगणवाडी ताई नी भर दिल्याने गेल्या 37 वर्षात अनेक चांगले अधिकारी चांगले नागरीक घडले त्या आपल्या प्रदीर्घ सेवे नंतर एप्रील 2024 अखेर सेवानिवृत्त झाल्या ्ही अंगणवाडी जिल्हा भरात आदर।श केली होती त्याना सेवानिवृत्ती निमीत्त ग्रामस्थाचे वतीने सत्कार करून निरोप देण्यात आला.या वेळी सुदामती लांब,किसकींदा लांब,प्रमीला हाडीबांग,सुनिता लांब,  राधा शेळके, मोहनराव लांब,सुंदर लांब,धंनजय लांब, उमेश लांब आदी ुउपस्थीत होते

Wednesday 15th of May 2024 07:51 PM

Advertisement

Advertisement