टँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावी
बीड, :- सद्यस्थितीत बीड जिल्हयामध्ये पर्जन्यमान कमी पडल्यामुळे अत्यल्प पाणी साठा असल्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात नसल्यामुळे जिल्हयातील ब-याच गावांमध्ये भिषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. ज्या गावामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली त्या गावाचे प्रस्तावास मंजूरी देवून ग्रामस्थांना टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
तेव्हा ज्या गावामध्ये पाणी टंचाई निर्माण झालेली आहे अशा गावामध्ये टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येतो परंतु गावामधील ग्रामस्थांना त्यांच्या गावामध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याबाबत माहिती होत नाही. ग्रामीण भागामध्ये टँकरने पाणी पुरवठा केल्यास संबंधित गुत्तेदार हा कमी खेपा होतात त्यामुळे ग्रामस्थांना आवश्यक तेवढे पाणी मिळत नाही परिणामी ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.
ग्रामस्थांना पिण्याचे पाण्याचे टँकर गावामध्ये प्रशासनामार्फत देण्यात आले किंवा कसे तसेच टँकरने पाण्याच्या खेपा कमी होत असल्याबाबत त्या अनुषंगाने ग्रामस्थांच्या तक्रारी असल्याबाबत कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद बीड तथा नोडल अधिकारी पाणी टंचाई बीड यांचे व्हॉटसाअॅप क्रमांक 7276325896 व 8668381415 वर तक्रारी नोंद करणे.जेणे करुन टंचाईग्रस्त असलेल्या गावामधील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही.