अत्याचार प्रकरणी आरोपीस न्यायालयीन कोठडी
केज - घरी एकटीच असलेल्या महिलेच्या घरात घुसून तिला व तिच्या पती, मुलास जीवे मारण्याची धमकी बळजबरीने अत्याचार केल्याची घटना २६ मार्च रोजी केज ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. सोमवारी न्यायालयाने या आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
केज - मांजरसुंबा रस्त्यावर पीडित २६ वर्षीय महिलेचे कुटुंब वास्तव्यास आहे. २७ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही महिला घरी एकटीच घरी होती. हीच संधी साधून आरोपी मल्हारी नारायण शिंदे (रा. हिवरापहाडी ता. जि. बीड) याने घरात घुसुन तु मला आवडतेस असे म्हणत त्याने या महिलेसह तिच्या पती व मुलांना जिवे मारण्याची धमकी देत बळजबरी करीत अत्याचार व जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. अशी तक्रार २८ मार्च रोजी पीडित महिलेने दिल्यावरून मल्हारी नारायण शिंदे याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी मल्हारी शिंदे यास अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.