साळेगाव येथे एकाचे डोके फोडले, मायलेकावर गुन्हा
केज - साळेगाव (ता. केज) येथील अलीम खुदमोद्दीन शेख यांच्या घरासमोरील सार्वजनिक बोअरचे पाईप निघून पाणी रस्त्यावर वाया जात असल्याने त्यांच्या चुलत्याने बोअरची मोटार बंद केली. ३१ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या नफीसा गुलाब शेख हिने बोअरची मोटार बंद केल्यावरून त्यांच्या चुलतीस शिवीगाळ केली. अलीम शेख यांनी चुलतीस शिव्या का देतात ? अशी विचारणा केली असता नफीसा हिने अलीम याचे गचुरे धरून खाली पाडले. तर तिचा मुलगा महेबूब गुलाब शेख याने डोक्यात दगड मारून डोके फोडले. जीवे मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार अलीम शेख यांनी दिल्यावरून नफीसा शेख, महेबूब शेख या मायलेकाविरुद्ध दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जमादार रामहरी भंडाने हे तपास करताहेत.
Monday 1st of April 2024 10:07 PM