जिवाचीवाडीत वर्ग खोल्या बांधकामाचे भूमीपूजन
केज - जिवाचीवाडी ( ता. केज ) येथे राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास - २०२२ - २३ अभियाना अंतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या दोन वर्ग खोल्या बांधकामासाठी १८ लाख ४० हजार रुपयांचा निधी आमदार नमिता मुंदडा यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाला आहे. शुक्रवारी या वर्ग खोल्या बांधकामाचे भूमीपूजन भाजपचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर, जिवाचीवाडीचे सरपंच दिपक काळे, उद्योजक बंडू चौरे, युवा नेते भागवत चौरे, शिवाजी चौरे, मुख्याध्यापक अंकुश मोराळे, अभियंता राजीव तेरखेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नंदकिशोर मुंदडा म्हणाले की, केज विधानसभा मतदार संघात आ. नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नातून सर्व समावेशक विकासाची कामे सुरू आहेत. जिवाचीवाडीला विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध देत प्रश्न मार्गी लावले आहेत. उर्वरित शाळेच्या वर्ग खोल्यासाठी येणाऱ्या काळात निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही ही त्यांनी दिली.
कार्यक्रमास पिंटू चौरे, मुन्ना चौरे, अनंत चौरे, श्रीराम कुटे, राजेभाऊ चौरे, आण्णा चौरे, डिंगाबर चौरे, ऍड. चौरे यांच्यासह तरूण व ग्रामस्थ उपस्थित होते.